दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पुणे 01

        दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि. पुणे ही स्वातंत्रपुर्वी काळात दि:- 20/6/1920 रोजी स्थापना झाली. संस्थेचा रजिस्टर क्रमांक 2966 आहे. संस्थेची स्थापना भाबुंर्डा मुख्यालय (सध्याचे शिवाजीनगर पोलीस मुख्यालय) येथे झाली होती. त्यावेळी संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष हे पोलीस उपअधिक्षक सोा. मुख्यालय तसेच पदसिध्द चेअरमन होम डी.वाय.एस.पी. हे असत. संस्थचे स्थापनेचे पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसेडिंग सचिव श्री. पाटील यांनी लिहीले होते. सन 1948 मध्ये संस्थेत 1 कर्मचारी कामकाज पाहत होते. 1950 साली संस्थेचे शेअर कॅपिटल 30,000 रुपये होते. सुरूवातीच्या काळात मंजूर कर्जाच्या 10ऽ रक्कम शेअर्स म्हणून कपात होत होती.


       संस्थेचे सभासदांमधुन निवडून आलेले पहिले संचालक मंडळ सन 1982 साली अस्तित्वात आले. संस्थेच्या भरभराठीमध्ये कै. गोपाळ गणेश चिटणीस (सेवानिवृत्त कार्यालय अधिक्षक) तसेच श्री. अनंत वामन गुप्ते व श्री. ज्ञानोबा मारुती झुरुंगे (निवृत्त संचालक ) यांचे योगदान मोलाचे आहे.


       संस्थेचे सचिव म्हणुन कै. दत्तात्रय बळवंत वाघमारे यांनी सन 1945 ते सन 1986 पर्यंत कामकाज पाहिले. हयांनी संस्थेची आर्थिक घडी व्यवस्थित बसवली. त्याचा संस्थेस फायदा आजतागायत होत आहे.


       संस्थेचे सचिव म्हणुन विश्वनाथ कृष्णाजी वडके यांनी सन 1986 ते सन 1988 पर्यंत कामकाज पाहिले.


       सन 1988 ते सन 1997 पर्यंत श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण जक्का यांनी संस्थेचे सचिव म्हणुन कामकाज पाहिले.


       सन 1997 ते सन 2002 पर्यंत श्री. सुरेश सोपानराव भोसले यांनी संस्थेचे सचिव म्हणुन कामकाज पाहिले.


       सन 2002 ते सन 2006 पर्यंत श्री. राम शंकर चौधरी यांनी संस्थेचे सचिव म्हणुन कामकाज पाहिले.


       सन 2006 ते एप्रिल 2015 पर्यंत श्री. सुरेश सोपानराव भोसले यांनी संस्थेचे सचिव म्हणुन कामकाज पाहिले.


       मे 2015 ते 17 ऑक्टोंबर 2015 पर्यंत श्री. राम शंकर चौधरी यांनी संस्थेचे सचिव म्हणुन कामकाज पाहिले.


       18 ऑक्टोंबर 2015 पासून श्री. प्रदीप दत्तात्रय वाघमारे हे संस्थेचे सचिव म्हणुन कामकाज पाहत आहेत.


       विद्यमान संचालक मंडळ सन 2006 साली प्रथम निवडून आले. त्यांच्या कारर्किदीत संस्थेची आर्थिक उलाढाल फार मोठया प्रमाणावर झाली. यांच्या कारर्किदीत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले त्यामुळे संस्थेची आर्थिक प्रगती झपाटयाने झाली.


       थोडया सभासदांवर चालू झालेली संस्था आता वटवृक्षाप्रमाणे मोठी झाली आहे. संस्थेचे साधारण 12,355 सभासद असुन एकुण भागभांडवल (काटकसर निधीसह) 141 कोटी रुपये आहे. संस्थेचे दरवर्षी नफ्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय बळकट व भक्कम आहे. संस्थेचे दरवर्षी शासकीय लेखापरीक्षण होत असून संस्थेस दरवर्षी ‘अ’ वर्ग मिळत आहे. संस्थेचे संपुर्ण कामकाज संगणक प्रणाली मार्फत चालू आहे.