दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पुणे 01

आर्वती ठेव योजना नियम व अटी.

    1) सदर योजनेसाठी सहभागी होणारे संस्थेचे सभासद असले पाहिजेत.

    2) या योजनेची मुदत 5 वर्ष व व्याज दर 9% द.सा.द.शे राहील

    3) सदर आर्वती ठेव योजना कमीत कमी रूपये 500 पासून सुरू करता येईल.

    4) सदरची दर महाची कपात दरमहा वेतनातून/एस.बी.आय बँकेतून ई.सी.एस. द्वारे केली जाईल.

    5) एक वर्षाच्या आत आवर्ती ठेव खाते बंद केल्यास व्याज आकारणी केली जाणार नाही.

    6) एक वर्ष पूर्ण व दोन वर्षाच्या आत खातेबंद केल्यास 3% ने कमी व्याज आकारणी केली जाईल.

    7) दोन वर्ष पूर्ण व तीन वर्षाच्या आत खातेबंद केल्यास 2% ने कमी व्याज आकारणी केली जाईल.

    8) तीन वर्ष पूर्ण व चार वर्षाच्या आत खातेबंद केल्यास 1% ने कमी व्याज आकारणी केली जाईल.

    9) चार वर्ष पूर्ण व पाच वर्षाच्या आत खातेबंद केल्यास 0.5% ने कमी व्याज आकारणी केली जाईल.

    10) व्याजात बदल करण्याचा अधिकार संचालक मंडळाला राहील.

    11) रुपये 1500 पेक्षा जास्त रक्कम आवर्ती ठेव मध्ये सभासदाच्या इच्छेनुसार घेण्यात येईल.

    12) शासकीय पत धोरणानुसार शासनाचे वेळोवेळी बदललेले नियम लागू राहतील.