दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. पुणे 01

सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी मुदत ठेव योजना (वय 58 वर्ष पूर्ण) नियम व अटी.

    1) नियत वयोमानानूसार सेवानिवृत्त झालेले नाममात्र सभादाकडून मुदत ठेव खात्यात संस्थेत केव्हाही ठेवी स्विकारण्यात येईल. प्रत्येक ठेवीदारास ठेवीची पावती दिली जाईल. सरळ व्याज पध्दतीने ठेवीवर व्याज आकारणी केली जाईल. दरमहा / तिमाही / सहामाही / वार्षिक व्याजाची रक्कम ठेवीदाराच्या एस.बी.आय बँक बचत खात्यामध्ये जमा केले जाईल.

    2) कायदा व नियम यांनी ठरवून दिलेल्या मर्यादेत संस्था ठेवी स्विकारेल.

    3) या योजनेची मुदत 5 वर्ष व व्याज दर ९ ते ९.५ % द.सा.द.शे राहील

    4) दरमहा / तिमाही / सहामाही / वार्षिक व्याज देणारी ठेव (कमीत कमी 50,000/- चे पुढे) इ. योजनेखाली ठेवी स्विकारता येईल.

    5) ठेवीची मुदत संपल्यानंतर 14 दिवसाच्या आत जर सभासदाने ठेवीची रक्कम परत घेतली नाही तर त्यावर बचत खात्याप्रमाणे व्याज देण्यात येईल किंवा ठेवीदारास सदरची मुदत ठेव पुन: गुंतवणूक करता येईल.

    6) ठेवीदाराने मुदत संपण्यापुर्वी मुदत ठेवीची रक्कम परत मागीतली तर ज्या कालावधी करीता रक्कम संस्थेकडे राहील त्या मुदतीसाठी असलेल्या व्याजदरापेक्षा 1 % कमी दराने त्यावर व्याज देण्यात येईल.

    7) पोलीस खात्यातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यास संस्थेचे नाममात्र सभासदत्व घ्यावे लागेल. त्यासाठी दरवर्षी प्रवेश फी 25/- रू. भरावी लागेल. मुदत ठेव अर्जासोबत पॅनकार्ड व एस.बी.आय बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स जोडणे आवश्यक राहील.

    8) ठेवीचे सर्व व्यवहार चेकने केले जातील. चेक कोणत्याही कारणाने न वटल्यास त्यावर 250/- रुपये दंड आकारण्यात येईल.

    9) मुदत ठेवीच्या तारणावर कर्ज दिले जाणार नाही.

    10) शासकिय पतधोरणानुसार संचालक मंडळ वेळोवेळी संस्थेची आर्थिक परीस्थिती पाहून ठेवीवरील व्याज दर निश्चित करणे व त्यामध्ये फेरबदल करण्याचे संचालक मंडळास अधिकार राहतील.