दि पुना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.(THE POONA DISTRICT POLICE CO-OP CREDIT SOCIETY LTD)

        दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.(THE POONA DISTRICT POLICE CO-OP CREDIT SOCIETY LTD) पुणे ही स्वातंत्रपुर्वी काळात दि:- 20/6/1920 रोजी स्थापना झाली. संस्थेचा रजिस्टर क्रमांक 2966 आहे. संस्थेची स्थापना भाबुंर्डा मुख्यालय (सध्याचे शिवाजीनगर पोलीस मुख्यालय) येथे झाली होती. त्यावेळी संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष हे पोलीस उपअधिक्षक सोा. मुख्यालय तसेच पदसिध्द चेअरमन होम डी.वाय.एस.पी. हे असत. संस्थचे स्थापनेचे पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसेडिंग सचिव श्री. पाटील यांनी लिहीले होते. सन 1948 मध्ये संस्थेत 1 कर्मचारी कामकाज पाहत होते. 1950 साली संस्थेचे शेअर कॅपिटल 30,000 रुपये होते. सुरूवातीच्या काळात मंजूर कर्जाच्या 10ऽ रक्कम शेअर्स म्हणून कपात होत होती.


       विद्यमान संचालक मंडळ सन 2006 साली प्रथम निवडून आले. त्यांच्या कारर्किदीत संस्थेची आर्थिक उलाढाल फार मोठया प्रमाणावर झाली. यांच्या कारर्किदीत महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले त्यामुळे संस्थेची आर्थिक प्रगती झपाटयाने झाली.


       थोडया सभासदांवर चालू झालेली संस्था आता वटवृक्षाप्रमाणे मोठी झाली आहे. संस्थेचे साधारण 12,355 सभासद असुन एकुण भागभांडवल (काटकसर निधीसह) 141 कोटी रुपये आहे. संस्थेचे दरवर्षी नफ्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय बळकट व भक्कम आहे. संस्थेचे दरवर्षी शासकीय लेखापरीक्षण होत असून संस्थेस दरवर्षी ‘अ’ वर्ग मिळत आहे. संस्थेचे संपुर्ण कामकाज संगणक प्रणाली मार्फत चालू आहे.