पूना डिस्ट्रिक्ट पोलीस

बचत खाते

ज्याच्यामुळं हा देश सुरक्षित आहे त्याच्या बचतीची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. केवळ सुरक्षिततेचीच नाही तर त्यावर उत्तम परतावा देऊन पोलिस बांधवांना एक परिपूर्ण बँकिंग अनुभव देणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. म्हणूनच आम्ही देतो बचत खात्याची सेवा, ज्या अंतर्गत तुम्हाला फोन बँकिंग, नेट बँकिंग सारख्या डिजिटल सेवा देखील मिळतात. त्यामुळे आमचे बचत खाते तुमच्या बँकिंग गरजेचे परिपूर्ण समाधान आहे.

  • दैनंदिन बचत आणि व्यवहारांसाठी एक विश्वासार्ह पर्याय.
  • कोणत्याही किमान शिल्लक अट शिवाय तुमचे आर्थिक व्यवहार सहज सुरु राहतात.
  • तुमचे पैसे सुरक्षित तर राहतातच पण जोडीला आकर्षक व्याजदर सुद्धा मिळतो.

अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या
किंवा काॅल करा.