मोबाइल बँकिंग
तुमच्या वेळेचं महत्त्व आम्ही जाणतो, म्हणूनच आम्ही आमच्या सभासदांना देतो मोबाइल बँकिंगची सेवा. आता बँकेचे व्यवहार होतील कधीही, कुठूनही, तेही फक्त काही क्लिकमध्ये! हाताळायला अगदी सोपे ॲप, युजर फ्रेंडली इंटरफेससह, ज्यामुळे तुम्ही तुमची खाती, त्यावरील शिल्लक आणि स्टेटमेंट पाहू शकता. शिवाय, पैशांचे व्यवहार स्मार्टफोनवरून सुरक्षित पद्धतीने सहज करू शकता. आमची मोबाइल बँकिंग सेवा २४/७ उपलब्ध आहे, ज्यामुळे तुमच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन सोपे, सुरक्षित आणि सोयीस्कर होते.
- तुमच्या खात्यातील शिल्लक आणि स्टेटमेंट त्वरित पाहण्याची सुविधा.
- तुमच्या खात्यांमध्ये किंवा इतर लाभार्थ्यांना सुरक्षितपणे पैसे ट्रान्सफर करू शकता.
- तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरून तुम्ही कधीही, कुठूनही सुरक्षितपणे बिल पेमेंट्स करू शकता.
- या आणि अशा असंख्य सेवांचा लाभ घेण्यासाठी आमच्या मोबाइल बँकिंग ॲपद्वारे बँकिंग करा.
इंटरनेट बँकिंग
बँकेच्या छोट्या-मोठ्या कामांपेक्षा तुमच्या कामाची जबाबदारी जास्त मोठी आहे, आणि त्यामुळे बँकेचे कुठलेही काम करण्यासाठी तुम्हाला आता बँकेत येण्याची गरज नाही. त्याउलट, तुम्ही जिथे असाल तिथेच आम्ही तुमच्या सेवेत तत्पर आहोत. आमची इंटरनेट बँकिंग सेवा तुम्हाला तुमच्या घर किंवा कार्यालयात आपली जबाबदारी पूर्ण करतं, बँकिंग व्यवहार करण्याची मुभा देते. ही सेवा सुरक्षित तर आहेच, शिवाय २४ तास उपलब्ध आहे. इंटरनेट बँकिंगसह, तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक, मनी ट्रान्सफर, बिले भरणे आणि शाखेला भेट न देता तुमच्या बचतीचे व्यवस्थापन करणे अशी सर्व कामे करू शकता. सुलभ, सुरक्षित, इन्स्टंट बँकिंगसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
- तुमच्या खात्यातील शिल्लक आणि स्टेटमेंट त्वरित पाहण्याची सुविधा.
- तुमच्या खात्यांमध्ये किंवा इतर लाभार्थ्यांना सुरक्षितपणे पैसे ट्रान्सफर करू शकता.
- सर्व प्रकारची बिले भरू शकता, रिचार्ज करू शकता व ऑटो पेमेंट सेट करून ठेऊ शकता.
- कर्जासाठी अर्ज करू शकता किंवा तुमच्या खात्याचे तपशील अपडेट करू शकता.
- इंटरनेट बँकिंगसह कुठूनही बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकता.
QR कोड
आमच्या कामाच्या व्यापात नेहमीच खिशात कॅश बाळगता येत नाही, अशात तुम्हाला QR कोड पेमेंट फायदेशीर ठरते. कुणाला आपला मोबाइल नंबर किंवा खाते क्रमांक न देता अगदी साजेस पैसे पाठवण्याची ही अत्यंत सुरक्षित पद्धत आहे. तुमचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी फक्त QR कोड स्कॅन करा आणि पैसे ट्रान्सफर करा. या डिजिटल सेवेमुळे तुम्ही सहज कॅशलेस ट्रान्झॅक्शन करू शकता.
- QR कोड स्कॅन फॅसिलिटीसह, सुरक्षित पेमेंट सेवा.
- बिले, खरेदी आणि इतर सेवांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह व्यवहाराचा पर्याय.
- सर्व व्यापारी आणि सेवा प्रदात्यांकडून स्वीकारले जाणारा पेमेंट मोड.
- कुठलीही खाजगी माहिती शेअर न करता सुरक्षित आणि जलद पेमेंट सेवा.