पूना डिस्ट्रिक्ट पोलीस

मुदत ठेव योजना

पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. आपल्या सभासदांना अर्थात पोलीस बांधवांना अनेक मुदत ठेव योजना ऑफर करते, ज्या सुरक्षित ठेव तर आहेतच जोडीला उत्तम परतावा देखील देतात. पोलीस बांधवांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य जपण्यासाठी आणि भविष्यातील गरज व स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या विविध मुदत ठेव योजनांअंतर्गत विशेष सुविधा देण्यात येतात, ज्यामुळे बचत तर सुरक्षित राहतेच त्यावर उत्तम परतावा देखील मिळतो. तुम्ही आपल्या गरजेनुसार निश्चित ध्येयपूर्तीसाठी खालीलप्रमाणे योग्य ती मुदत ठेव योजना निवडू शकता.

नियमित मुदत ठेव योजना

“पैशाने पैसे वाढतात” याच उत्तम उदाहरण म्हणजे, मुदत ठेव योजना! आमची मुदत ठेव योजना बचतीला सुरक्षित आणि खात्रीशीर मार्गाने वाढवण्यासाठी उपयोगी ठरते. नियोजित कालावधीनंतर गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा तर मिळतोच, शिवाय गरजेच्या वेळी मुदत ठेवीवर लोन देखील घेता येते त्यामुळे ठेव मोडायची गरज पडत नाही.

फायदे:

  • निश्चित व्याजदरांसह खात्रीशीर परतावा.
  • तुमच्या आर्थिक गरजांप्रमाणे मुदत निवडण्याची मुभा.
  • बचतीची मूळ रक्कम आणि परतावा याला कोणताही धोका नसणारी सुरक्षित गुंतवणूक.

मासिक उत्पन्न मुदत ठेव योजना

रिटायरमेंट झाली किंवा दर महा एक ठराविक रक्कम हवी असेल तर तुम्हाला केवळ परताव्यातून ही रक्कम मिळू शकते यासाठी सर्वोत्तम आहे ‘मासिक उत्पन्न मुदत ठेव योजना’. यामध्ये दर महा परताव्याची ठराविक रक्कम तुमच्या खात्यात जमा होत राहते, आणि तुमची मूळ रक्कम देखील जशाच तशी सुरक्षित राहते.

फायदे:

  • दरमहा सुनिश्चित रक्कम मिळते.
  • बचतीची मूळ रक्कम सुरक्षित राहते आणि परतावा मिळत राहतो.
  • निवृत्त व्यक्तीसाठी व दरमहा ठराविक रक्कम मिळवू पाहणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय.

त्रैमासिक उत्पन्न मुदत ठेव योजना

पोलीस बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन त्रैमासिक उत्पन्न मुदत ठेव योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांना दर तीन महिन्यांनी परतावा मिळतो, जर तुम्हाला दर तीन महिन्यांनी काही कारणास्तव पैशाची गरज भासत असेल तर त्रैमासिक उत्पन्न मुदत ठेव योजना उत्कृष्ट पर्याय आहे. ज्यामुळे गरज पूर्ण होतात, त्रैमासिक पेआउट मिळतो आणि मूळ रक्कम सुरक्षित राहते.

फायदे:

  • तुमच्या आर्थिक नियोजनासाठी त्रैमासिक व्याज पेआउट्स.
  • मुदतीचे पर्याय आणि खात्रीशीर परतावा.
  • त्रैमासिक उत्पन्न हव्या असणाऱ्या सभासदांसाठी उत्तम पर्याय.

अर्धवार्षिक उत्पन्न मुदत ठेव योजना

त्रैमासिक उत्पन्न मुदत ठेव योजनेप्रमाणे अर्धवार्षिक उत्पन्न मुदत ठेव योजना तुम्हाला दर सहा महिन्यांनी व्याज पेआउट्स करते. अर्धवार्षिक उत्पन्न मिळवणे पसंत करणाऱ्या सभासदांसाठी ही योजना उत्तम आहे. ज्यात तुमची मूळ रक्कमही सुरक्षित राहते आणि अर्धवार्षिक परतावा खात्यात जमा होत राहतो.

फायदे:

  • अर्धवार्षिक व्याज पेआउट्स.
  • मुदतीचे पर्याय आणि खात्रीशीर परतावा.
  • अर्धवार्षिक उत्पन्न हव्या असणाऱ्या सभासदांसाठी उत्तम पर्याय.

वार्षिक उत्पन्न मुदत ठेव योजना

वर्षाकाठी अनेक खर्च येतात, कधी सण समारंभ कधी विम्याचे वार्षिक हफ्ते… आता हे खर्च तुम्ही केवळ व्याज पेआउट्स मधून देखील करू शकता. आमची वार्षिक उत्पन्न मुदत ठेव योजना अशा सभासदांसाठी सुरु करण्यात आली आहे जे वार्षिक परतावा मिळवू इच्छितात. ही योजना दीर्घकालीन बचत करणाऱ्यांसाठी उत्तम आहे.

फायदे:

  • दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी वार्षिक व्याज पेआउट्स.
  • उत्तम परतावा आकर्षक व्याजदर.
  • खात्रीशीर परताव्यासह सुरक्षित गुंतवणूक.

अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या
किंवा काॅल करा.