About
संस्थेविषयी

समाजाला संरक्षण देणाऱ्यांच्या आर्थिक रक्षणासाठी कटिबद्ध!

भारतीय नागरिकांची विविध संकटांपासून दिवस-रात्र सुरक्षा करणाऱ्या पोलीस बांधवांना आर्थिक आधार मिळावा या हेतूने 1920 मध्ये दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे ची स्थापना झाली. सुरुवातीला, संस्थेचे मुख्यालय भांबुर्डा अर्थात सध्याचे शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे होते, जे आता पुणे येथे आहे. पहिल्या दिवसापासूनच संस्था आपल्या सभासदांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहे.

संस्थेचे सध्या असलेले १४,६०० सभासद आणि २२७ कोटी रुपयांचे भांडवल हे याची साक्ष देते. संस्थेच्या सगळ्या सेवा सभासदांच्या गरजेनुसार वेळोवेळी अद्ययावत केल्या जातात. आज संस्था डिजिटल आणि मोबाईल बँकिंग सारख्या संपूर्ण आधुनिक सेवा पुरवते, आणि येत्या काळात ‘सहकारातून समृद्धी आणि विकास’ या तत्वाला धरून विविध नवनवीन योजना आणण्याचा संस्थेचा मानस आहे.

प्रिमियम सेवा

आमच्या बँकिंग सेवा

ठेव योजना

ज्या प्रमाणे पोलीस यंत्रणा जनतेच्या संरक्षणासाठी कायम दक्ष असते, त्याचप्रमाणे आमच्या ठेव योजना तुमच्या बचतीला सुरक्षित ठेऊन, त्यांना सातत्याने वाढवण्यासाठी कटिबद्ध आहेत. ज्यात तुमच्या गरजेनुसार विविध ठेव योजनांचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी योग्य त्या योजनेची निवड करू शकता.

  • गरजेनुसार फ्लेक्सिबल मुदतीच्या पर्यायांसह खात्रीशीर परतावा मिळवा.
  • नियमितपणे बचत करा आणि उत्तम व्याज कमवा.
  • निवृत्त पोलीस सदस्यांसाठी विशेष योजना.
Images

कर्ज योजना

देशवासीयांवर आलेल्या संकटांशी दोन हात करणाऱ्या पोलीस बांधवांना आर्थिक संकटाशी लढण्यासाठी संस्था विविध कर्ज योजना उपलब्ध करून देते, मग ते वैयक्तिक वापरासाठी असो, किंवा गृहस्वप्नपूर्तीसाठी. प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. शिवाय कमी व्याजदर, परतफेडीचे विविध पर्याय व तारण सेवा देखील उपलब्ध आहेत.

  • वैयक्तिक गरजांसाठी जलद आणि कमी व्याजदराच्या कर्ज योजना.
  • आता कमी व्याजदरात आपले गृहस्वप्न पूर्ण करा.
  • आपत्कालीन आणि अनपेक्षित गरजांसाठी जलद कर्ज मिळवा.
Images

बचत खाते

जे आमची सुरक्षा करतात त्या पोलीस बांधवांची बचत आम्ही ठेवतो सुरक्षित. आमचे बचत खाते सुरक्षितता व उत्तम परतावा देण्याच्या दृष्टीने तयार केले गेले आहे. तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजांसाठी जी बचत करता किंवा काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी जमापुंजी सांभाळून ठेवता, तिच्या सहज आणि सोप्या व्यवहारांसाठी आमचे बचत खाते तुम्हाला विविध बँकिंग सेवा पुरवते, सोबतच त्यावर उत्तम व्याजदर देखील मिळतो.

  • दैनंदिन बचत आणि व्यवहारांसाठी विश्वासार्ह पर्याय.
  • कोणत्याही मिनिमम डिपॉजिट शिवाय तुमचे आर्थिक व्यवहार सुरळीत चालू राहतात.
  • तुमची बचत सुरक्षित राहते व उत्तम व्याजदर देखील मिळतो.
Images

स्मार्ट बँकिंग

जे बारा महिने चोवीस तास जनसेवेत तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांना प्रत्येक गरजेच्या वेळी बँकेत येणं शक्य नसतं, म्हणून आमचे स्मार्ट बँकिंग सोल्यूशन्स तुम्हाला कधीही, कुठेही आर्थिक व्यवहारांना पूर्ण करण्याची मुभा देते. आमच्या डिजिटल सेवांचा मुख्य उद्देश म्हणजे बँकिंग सेवांना जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवणे आहे.

  • तुमच्या स्मार्टफोनवरून बँकिंग व्यवहार करण्याची सुविधा.
  • कधीही कुठूनही सुरक्षितपणे सर्व बँकिंग गरजा पूर्ण करा.
  • आमच्या QR कोड फीचरचा वापर करून जलद आणि सुरक्षित पेमेंट करा.
Images
why-choose-img

आपल्या हक्काचा अन विश्वासाचा अर्थमित्र..

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे म्हणजे, केवळ एक आर्थिक व्यवहारांसाठी बँकिंग सेवा पुरवणारी संस्था नाही, तर आम्ही आहोत एक विश्वासू सोबती, जो भारत देशाला सशक्त बनवणाऱ्या समस्त पोलीस बांधवांना आर्थिक दृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी समर्पित आहे. आज आर्थिक गरजांसाठी आम्ही हजारो पोलीस बांधवांचा पहिला विश्वास ठरलो आहोत.

Images
कमी व्याजदराचे कर्ज

आमच्या सभासदांना विविध गरजा त्वरित पूर्ण करण्यासाठी आम्ही देतो अत्यंत कमी व्याजदरात तात्काळ कर्ज.

Images
बचत योजनेचे विविध पर्याय

आमच्या विविध बचत योजनांसह निश्चितपणे बचत करा आणि आकर्षक व्याजदरांसह तुमची बचत वाढवा.

Images
एक शतकाहूनही अधिकचा विश्वास

शंभर वर्षांहून अधिक काळाच्या विश्वासार्ह परंपरेचे सोबती, आर्थिक सेवा आणि अत्यंत सुरक्षित कार्यपद्धती.

अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा
काॅल करा.

कोणतेही प्रश्न विचारले?

कायम विचारले जाणारे प्रश्न

आम्ही पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित एक विश्वासार्ह आर्थिक संस्था आहोत. या संस्थेची स्थापना 1920 मध्ये झाली. तेव्हापासून आम्ही कर्ज योजना, बचत खाती, ठेवी योजना आणि स्मार्ट बँकिंग सोल्यूशन्स यांसारख्या विविध आर्थिक सेवा पुरवत आहोत.
सभासद होण्यासाठी, तुम्हाला सदस्यत्व अर्ज फॉर्म भरावा लागेल आणि ओळखपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. तुम्ही आमच्या ‘Our Membership’ या पेजवरून सदस्यत्व अर्ज फॉर्म डाउनलोड करू शकता किंवा मदतीसाठी नजीकच्या शाखेला भेट देऊ शकता.
होय, आम्ही निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष ठेव योजना उपलब्ध करून देतो. अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या वेबसाइटवरील ‘Retired Police Personnel Services’ पेजला भेट द्या.
तुम्ही आमच्या ग्राहक सेवा टीमला फोन, ईमेल किंवा नजीकच्या शाखेला भेट देऊन संपर्क साधू शकता. अधिक माहितीसाठी, आमच्या वेबसाइटवरील ‘Contact Us’ पेजला भेट द्या.
संपर्क

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

Testimonial

Our Client Reviews

News & BLog

Read Our Latest News & Articals