About
संस्थेविषयी

समाजाला संरक्षण देणाऱ्यांच्या आर्थिक रक्षणासाठी कटिबद्ध!

भारतीय नागरिकांची विविध संकटांपासून दिवस-रात्र सुरक्षा करणाऱ्या पोलीस बांधवांना आर्थिक आधार मिळावा या हेतूने 1920 मध्ये पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. ची स्थापना झाली. सुरुवातीला, संस्थेचे मुख्यालय भांबुर्डा अर्थात सध्याचे शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे होते, जे आता पुणे येथे आहे. पहिल्या दिवसापासूनच संस्था आपल्या सभासदांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहे. एक छोटंसं रोपटं ग्राहकांच्या प्रेम आणि विश्वासाने बहरंत गेलं, आणि आज एक शतक उलटून गेले तरी त्याच जोमाने संस्थेची अविरत सेवा सुरू आहे. १४,६०० सभासद आणि ₹२२७ कोटी रुपयांच्या एकूण भागभांडवलासह आम्ही आमच्या पोलीस बांधवांचे विश्वासू भागीदार ठरलो आहोत.


संस्थेच्या सगळ्या सेवा सभासदांच्या गरजेनुसार वेळोवेळी अद्ययावत केल्या जातात. आज संस्था डिजिटल आणि मोबाईल बँकिंग सारख्या सगळ्या आधुनिक सेवा पुरवते, आणि येत्या काळात "सहकारातून समृद्धी आणि विकास" या तत्वाला धरून विविध नवनवीन योजना आणण्याचा संस्थेचा मानस आहे. प्रत्येक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी असंख्य अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज असं परिपूर्ण समाधान सभासदांना एकाच छताखाली मिळवून देत आहे आणि यापुढेही तितक्याच आपुलकीने, तत्परतेने आणि सुरक्षितपणे देत राहील याची आम्ही खात्री देतो.

Services Services

ध्येय

जनसेवेत असणाऱ्या पोलीस बांधवांना सर्वोत्तम बँकिंग सेवा देणारी केवळ पुण्यातील नाही तर महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी क्रेडिट सोसायटी बनणे, व सभासदांना उत्कृष्ट बँकिंग सेवा व जास्तीत जास्त परतावा देणे हे आमचे ध्येय आहे.

Services Services

उद्दिष्ट

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणत जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांना गरजेच्या वेळी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, आणि विविध बँकिंग सेवांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.

नेतृत्वाचा वटवृक्ष :

पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. ला कायम दूरदर्शी आणि विचारवंत असे नेतृत्व लाभले आहे, ज्यांचा संस्थेच्या यश आणि प्रगतीत मोलाचा वाटा आहे. त्यांच्या समर्पक सेवाभाव आणि दृढनिश्चयी स्वभाव संस्थेच्या झपाट्याने होणाऱ्या विकासासाठी निर्णायक ठरला आहे.

स्व. श्री. दत्तात्रय बळवंत वाघमारे (सचिव, १९४५-१९८६): संस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व, त्यांनी खऱ्या अर्थाने आर्थिक स्थैर्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या ४१ वर्षांच्या नेतृत्वातून त्यांनी संस्थेचा दीर्घकालीन विकास सुनिश्चित केला.

श्री. विश्वनाथ कृष्णाजी वाडके (सचिव, १९८६-१९८८): संस्था आपल्या विकासपथावर गतिशीलपणे वाटचाल करत असताना यांनी संस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण जक्का (सचिव, १९८८-१९९७): यांच्या नेतृत्वाखाली, संस्थेने बँकिंग सेवेचा आवाका वाढवला आणि सभासदांना अधिक चांगल्या सेवा पुरवण्यासाठी नवीन आर्थिक समीकरण आखले.

श्री. सुरेश सोपानराव भोसले (सचिव, १९९७-२००२; २००६-एप्रिल २०१५): एक प्रमुख नाव ठरले, कारण त्यांनी संस्थेच्या आर्थिक धोरणांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले, ज्यामुळे संस्थेच्या ठेवीत वाढ झाली आणि सभासद देखील समाधानी झाले.

श्री. राम शंकर चौधरी (सचिव, २००२-२००६; मे २०१५ - ऑक्टोबर २०१५): संस्थेच्या कार्यपद्धतीचे आधुनिकीकरण करण्यावर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले, त्यांनी खऱ्या अर्थाने भविष्यातील तांत्रिक प्रगतीसाठी पायाभरणी केली.

श्री. प्रदीप दत्तात्रय वाघमारे (सचिव, १८ ऑक्टोबर २०१५ पासून): सध्या संस्थेचे नेतृत्व करत आहेत, त्यांनी काळजी गरज समजून संस्थेच्या स्मार्ट बँकिंगला चालना दिली आहे, ज्यामुळे सभासदांना कधीही कुठूनही सुरक्षित व कार्यक्षम आर्थिक सेवांचा लाभ घेता येतो.

श्री. ज्ञानेश्वर बाबुराव जगताप (सचिव, मे २०१७ – ऑक्टोबर २०१९): संस्था कठीण काळात असताना यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व फार मोलाचे ठरले. श्री. ज्ञानेश्वर बाबुराव जगताप यांच्या सुनियोजित व्यवस्थापनामुळेच पुढे संस्थेची झपाट्याने प्रगती झाली.

श्री. स्वप्नील चंद्रकांत खरात (सचिव, नोव्हेंबर २०१९ – मार्च २०२१): हे संस्थेचे सर्वात तरुण नेतृत्वांपैकी एक आहेत. कोविडच्या अतिशय गंभीर काळात श्री. स्वप्नील चंद्रकांत खरात यांचे नेतृत्व मोलाचे ठरले, ज्यांनी संस्थेचे व्यवस्थापन अत्यंत उत्तम प्रकारे सांभाळले.

श्री. राजेंद्र काळूराम नागवडे (सचिव, मार्च २०२१ – जून २०२४): मुदत ठेवी या संस्थेचा कणा असतात, आणि हाच कणा मजबूत केला. श्री. राजेंद्र कालूराम नागवडे यांनी; त्यांच्या कार्यकाळात मुदत ठेवी वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

श्री. प्रविण उत्तम खामकर (सचिव, जुलै २०२४ पासून): यांनी सचिव पदाचा नव्याने कार्यभार हाती घेतला आहे. श्री. प्रविण उत्तम खामकर यांचे मार्गदर्शन आणि निर्णायक भूमिका संस्थेला नवी उंची देत आहे.

श्री. बालाजी वैजनाथराव सातपुते (व्यवस्थापक, नोव्हेंबर २०२० पासून): हे सध्या संस्थचे नेतृत्व करत आहेत, त्याच्यातील उत्तम नेतृत्व कौशल्य संस्थेच्या सभासदांना नवा विश्वास आणि समाधानी सेवा प्रदान करीत आहे. संस्थेच्या कार्यपद्धतीचे अत्याधुनिकीकरण करण्यावर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले, त्यांनी खऱ्या अर्थाने भविष्यातील तांत्रिक प्रगतीसाठी पायाभरणी केली. त्यांनी काळाची गरज समजून संस्थेच्या स्मार्ट बँकिंगला चालना दिली आहे, ज्यामुळे सभासदांना कधीही कुठूनही सुरक्षित व कार्यक्षम आर्थिक सेवांचा लाभ घेता येतो. यांच्या नेतृत्वात संस्थेस ISO 2009:2015 सर्टिफिकेशन मिळवले.

समृद्धीचा सुवर्णकाळ

छोट्याशा संस्थेपासून ते आज एक सक्षम आणि समृद्ध बँकिंग सेवा देणारी संस्था होईपर्यंतचा हा प्रवास अद्भुत आहे. आज संस्थेत डिजिटल सेवा आहेत, फोनबँकिंगच्या सुविधा आहेत, ज्यामुळे आम्ही सभासदांना जलद व सुरक्षित सेवा प्रदान करतो. गव्हर्नमेंट ऑडिटमध्ये आम्हाला कायम ‘A’ श्रेणी मिळाली आहे, यावरून संस्थेची मजबूत आर्थिक स्थिती, पारदर्शकता आणि वचनबद्धता दिसून येते.

संस्था दिवसेंदिवस प्रगती करीत आहे, जोडीला संस्थेच्या सेवांमध्ये देखील सुधारणा होत आहे, परिणामी सभासदांची देखील आर्थिक प्रगती होत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या शतकापासूनच सभासदांचा जो विश्वास आम्ही कमावला तो आजही टिकून आहे आणि याच विश्वासाच्या भांडवलावर आम्ही पोलीस बांधवांना उत्तम बँकिंग सेवा आणि आर्थिक स्थैर्य प्रदान करीत आहोत.

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड

संचालक मंडळ

सागर घोरपडे
अध्यक्ष
आकाश फासगे
उपाध्यक्ष
शशिकांत नरुटे
मानद सचिव
उदय काळभोर
खजिनदार
सुमित कदम
संचालक
दिनेश गडांकुश
संचालक
राजेंद्र मारणे
संचालक
अनिल गावडे
संचालक
जमीर तांबोळी
संचालक
गणपत गोरे
संचालक
अनिल भोंग
संचालक
वैशाली गोडगे
संचालिका
आशा राठोड
संचालिका
महेश गायकवाड
तज्ञ संचालक
बालाजी सातपुते
कार्यलक्षी संचालक
दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड

सेवक वर्ग

अ.क्र सेवकांचे नाव हुद्दा
1 श्री. बालाजी सातपुते व्यवस्थापक
2 श्री. प्रविण खामकर सचिव
3 श्री. चंद्रकांत तुपे वरिष्ठ लिपिक
4 श्री. राजेंद्र नागवडे वरिष्ठ लिपिक
5 श्रीमती. वैशाली वाघमारे कनिष्ठ लिपिक
6 श्री. सचिन राऊत कनिष्ठ लिपिक
7 श्री. रमेश लोकरे कनिष्ठ लिपिक
8 श्री. मानसिंह निंबाळकर कनिष्ठ लिपिक
9 श्रीमती तृप्ती गायकवाड कनिष्ठ लिपिक
10 श्री. तेजस हांडे कनिष्ठ लिपिक
11 श्री. हेमंत शिंदे कनिष्ठ लिपिक
12 श्री. विजय पांढरे कनिष्ठ लिपिक
13 श्रीमती. वंदना साठे कनिष्ठ लिपिक
14 सौ. वैशाली बनसोडे कनिष्ठ लिपिक
15 श्रीमती. अंजली जाधव कनिष्ठ लिपिक
16 श्रीमती. प्रेरणा गोसावी कनिष्ठ लिपिक
17 श्री. रुपेश सरगर कनिष्ठ लिपिक
18 श्री. वैभव बुर्डे दफ्तरी
19 श्री. राहूल कांबळे दफ्तरी
20 श्री. निलेश सकट कार्यलयीन शिपाई