आवर्ती ठेव योजना
पोलीस खात्यात जसे शिस्तीला महत्व आहे, तसेच आयुष्यात बचतीला महत्त्व द्यायला हवे. आणि हीच बचतीची शिस्त आयुष्यात येते पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या आवर्ती ठेव योजनेमुळे… या योजनेत सभासदांना सुरक्षित पद्धतीने उत्तम व्याजदर मिळतो. शिस्तबद्ध बचतीच्या सवयीसाठी ही एक उत्तम योजना आहे कारण यात दर महा ठराविक तारखेला नियोजित रक्कम भरावी लागते, ज्याचा लॉंगटर्म भरपूर फायदा मिळतो.
छोट्या-छोट्या बचतीतून मोठी स्वप्न साकार करण्याची मुभा आवर्ती ठेव योजना देते. ठराविक मुदतीनंतर तुम्ही तुमचे अशक्य स्वप्न देखील साकार करू शकता. भविष्यासाठीची तरतूद असो किंवा मुलाच्या उच्च शिक्षणाची व्यवस्था, आपत्कालीन निधीसाठी असो किंवा परदेश यात्रा प्रत्येक भविष्यातील गरजेसाठी आवर्ती ठेवी योजना बेस्ट आहे.
इथे तुमची बचत सुरक्षित आहेच शिवाय हमखास आकर्षक परताव्याची हमी देखील आहे, त्यामुळे आजच आमच्या आवर्ती ठेवी योजनेसोबत तुमच्या स्वप्नपूर्तीला सुरुवात करा आणि खात्रीशीर परताव्यासह तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा.