पूना डिस्ट्रिक्ट पोलीस

निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष ठेव योजना

ज्यांनी आपलं आयुष्य जनसेवा आणि सुरक्षेला वाहिलं अशा वीरांना निवृत्तिनंतर एक सुखी आणि समृद्ध आयुष्य लाभावं यासाठी आम्ही देतो निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष ठेव योजना. यात त्यांना इतर मुदत ठेव योजनांपेक्षा जास्त परतावा मिळतो आणि मुदतीचेही विविध पर्याय मिळतात. आम्ही जाणतो निवृत्तीच्या काळात आर्थिक सुरक्षा व स्थैर्य अत्यंत महत्त्वाचे असते, म्हणूच आम्ही देतो सुरक्षित पद्धतीने खात्रीशीर परतावा.

आता निवृत्तीनंतर तुमचं उत्पन्न थांबणार नाही तर ते परताव्याच्या स्वरूपात सुरूच राहणार. आपली बचत निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठीच्या विशेष ठेव योजनेत गुंतवा आणि निश्चित व्हा. या योजनेत कुठलीही जोखीम नाही, त्यामुळे तुम्ही फक्त मनःशांती आणि निवृत्त जीवनाचा भरभरून आनंद घ्या.

निवडा एक निश्चित निवृत्त आयुष्य, निवडा पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. ची निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठीची विशेष ठेव योजना.

अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या
किंवा काॅल करा.